माझ्या आयुष्यात कोणाची गोलंदाजी खेळण्याची मी धास्ती बाळगली असेल तर ती फक्त राजिंदर गोयलचीच.
तो एक शालीन, साधा, भिडस्त माणूस आहे. रणजी ट्रॉफी सामन्यात त्यानं जे पराक्रम गाजवलेत त्याबद्दल त्याच्या मनात गर्व वा ताठा नाही. कोणालाही त्याच्याशी बोलायला आनंदच वाटेल. वर सांगितल्याप्रमाणे तरुण खेळाडूंच्या दृष्टीनं तो एक आदर्श खेळाडू आहे. तो जरी कसोटी खेळाडू नसला तरी माझ्या खाती त्याची किंमत मोठी आहे… कारण मी ज्यांची गोलंदाजी खेळलो, त्यातला तो एक अत्यंत उत्कृष्ट गोलंदाज आहे.......